Answers

2016-03-27T14:14:48+05:30
वाचनाची आवड लहानपणीच मला लागली - ४थीत असताना. वडिलांनी वाचनाच्या हौसेपोटी जमवलेली चांगली पुस्तके होती जेमतेम एक ट्रंकभर. पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर ती वाचता वाचता मला पुस्तकं विकत घेऊन वाचावीशी वाटू लागलं. पण खरा ग्रंथसंग्रह वाढू लागला तो कॉलेजात शिकायला लागल्यापासून. मी आर्ट्सचा विद्याथीर् - मराठी व संस्कृत हे आवडते विषय. इंग्रजी एक उत्तम ज्ञानसंवर्धक भाषा म्हणून आवडू लागली. त्या काळात मी मला वडील देत असलेल्या साप्ताहिक पॉकेटमनीचा उपयोग जुनी पुस्तकं विकत घेण्यासाठी करू लागलो. त्या काळात गिरगाव नाक्याच्या फूटपाथवर जुनी पुस्तकं विकणाऱ्यांकडून मला खूप पुस्तकं मिळाली. एकूणच ललित वाङ्मयापेक्षा वैचारिक साहित्यकृतींकडे ओढा जास्त म्हणून तशी खरेदी होत गेली. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर मला पुस्तकं विकत घेऊन संग्रह करण्यात जास्तच मजा वाटू
0