Answers

2016-04-09T09:43:08+05:30

मोर हा सुंदर पक्षी आहे . मोर मला खूप आवडतो.

मोराला पाहताच मन आनंदित होते .त्याचे चमकदार निळे हिरवे अंग सुंदर दिसते. त्याच्या डोक्यावर चमकदार तुरा असतो . तो रुबाबात चालतो.

प्राचीन काळापासून मोर हा लोकप्रिय पक्षी आहे. मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे . आपल्या देशातील चित्रकारांचाही तो आवडता पक्षी आहे.

कवींनीसुद्धा मोरावर खूप कविता लिहिल्या आहेत. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे .

मोर आपल्या खूप उपयोगी पडतो . तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप, उंदीर , बेडूक इत्यादी उपद्रवी प्राणांना मोर खातो . तो आपल्या बागांची, वनांची शोभा वाढवतो .

पाऊस सुरु झाला कि , मोर पिसारा फुलवून नाचतो . मला मोराचा नाच खूप आवडतो . मी नाचणाऱ्या मोराची खूप चित्रे जमवली आहेत .

2 5 2