Answers

2015-04-15T13:26:51+05:30
पाऊस पावसाचे चक्र पाऊस — ब्राझील. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पडणारे पाण्याचे थेंब. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. पावसाची झड संततधार अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने,पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड भारतातील महाराष्ट्र राज्यात साधारणत: श्रावण महिन्यात असते. नागपंचमी व पोळ्यादरम्यान ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. ओला दुष्काळ पडतो.

0